
सोलापूर : रेल्वेने संपादित केलेल्या जमिनीचा मोबदल्यासाठी आंदोलन
सावळेश्वर : रेल्वे विभागाने मोहोळ ते पाकणी दरम्यान दुहेरीकरणासाठी अनेक शेतकऱ्याच्या संपादित केलेल्या जमिनीचा मूल्यांकनानुसार योग्य मोबदला मिळाला नाही. संपादित जमिनीचा वाढीव मोबदला तत्काळ शेतकऱ्यांना द्यावा, या मागणीसाठी रामहिंगणी येथील रेल्वे गेट क्र. ४९ च्या ठिकाणी बाधित शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी रेल्वेच्या वतीने सहाय्यक मंडल अभियंता वाय. बी. राव यांनी प्रत्यक्ष शेतकाऱ्यांसोबत येऊन जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.
या आंदोलनासाठी रामहिंगणी येथील भाऊ वाघमोडे, अतिष मारकड, बाळासाहेब वाघमोडे, दादा वाघमोडे, हनुमंत वाघमोडे, सरपंच किरण वाघमोडे, राजेंद्र वाघमोडे, रणजित नडमनी, महादेव भोसले, पोतदार आदींसह कोळेगाव, वडवळ, रामहिंगणी, मुंढेवाडी, पोपळी, विरवडे खुर्द येथील बाधित शेतकरी उपस्थित होते.
हेही वाचा: सोलापूर : पाऊस चांगला झाला असला तरी; जलसाक्षरता चळवळ व्यापक करा
आंदोलनस्थळी भूसंपादन विभागाचे प्रतिनिधी न आल्याने आंदोलक उद्रेकाच्या भूमिकेत होते. मात्र मोहोळ पोलिस ठाण्याच्या मध्यस्थीने अनर्थ टळल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलनाच्या ठिकाणी आरपीएफ पोलिस निरीक्षक सतीश विधाते, पोलिस उपनिरीक्षक अनुज पटेल, एएसआय श्रीकृष्ण कुठे, जगदीश डांगे, योगेश खारे, राजकुमार कापुरे, सोलापूर लोहमार्ग पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत वाघमारे, मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सुधीर खरगे आदींसह उपस्थित होते.
Web Title: Solapur Railway Farmer Land Protest Money
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..