
Heavy Rain in Solapur Causes Major Highway Blockage
Esakal
मराठवाड्यासह राज्यातील काही भागात पावसानं थैमान घातलंय. दुष्काळी गावांना अतिवृष्टीने झोडपल्यानं गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. नद्यांच्या पाणी पातळीत अभूतपूर्व अशी वाढ झाल्यानं अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. सीना नदीला इतिहासात पहिल्यांदाच पूर आलाय. नदीचं पाणी लांबोटी इथं सोलापूर-पुणे महामार्गावर आलं आहे. यामुळे सोलापूर पुणे महामार्ग रात्री ११ वाजल्यापासून बंद करण्यात आलाय. परिणामी महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.