A theft was reported at the residence of a Solapur police officer’s brother,
सोलापूर : कुमठा नाका परिसरातील बालाजी हाउसिंग सोसायटीतील लखन भगतसिंग पिंगुवाले यांच्या घरी चोरी झाली आहे. ५ डिसेंबर रोजी त्यांची वहिनी दवाखान्यात जाऊन येईपर्यंत ही चोरी झाली आहे. चोरट्याने घरातील दोन लाख रुपयांचे दागिने लंपास केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी पोलिस निरीक्षक गणेश पिंगुवाले यांचे भाऊ आहेत.