सोलापूर : गुलाबाची शेती करून एकरी तीन लाखांचे उत्पन्न

गोमय व गोमुत्राच्या वापराने गुलाबाची शेती फुलवली.
गुलाबाची शेती
गुलाबाची शेतीsakal

सोलापूर : गाईच्या शेण व गोमुत्रापासून प्रभावी खताच्या मदतीने वडजी (ता. द.सोलापूर) येथील निवृत्ती पाटील यांनी एक एकरात गुलाबाची लागवड करत वर्षभरात तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.

निवृत्ती पाटील यांना पूर्वीपासून गाईच्या शेण व गोमुत्रापासून खते करण्याची आवड होती. मागीलवर्षी त्यांनी एक एकरात गुलाबाची लागवड करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी २२ गाड्या शेणखत लागवडीपूर्वी टाकले. त्यानंतर गुलाबाच्या कलमा आणून लावल्या. या गुलाबाला त्यांनी सुरवातीपासून घरीच बनवलेली खते वापरली. त्यासाठी त्यांनी जीवामृत व गोकृपामृतचा वापर केला. त्यांनी काही कंपोस्ट खत व बॅक्‍टेरियल कल्चरचा उपयोग केला. गावरान गुलाबाची निवड त्यांनी केली. यासोबत त्यांनी गुळापासून जीवामृतदेखील घरीच तयार करुन त्याचा उपयोग केला. खुरपणी घरच्या लोकांनी केल्याने मजुरीचा खर्च वाचला. या गुलाबाला त्यांनी ठिबकने पाणी दिले.

गुलाबाची शेती
राज्याला मोठा दिलासा; दिवसभरात आढळला नाही ओमिक्रॉनचा रुग्ण

चाळीस दिवसांत कोंब फुटल्यानंतर दीडच महिन्यात फुले येण्यास सुरवात झाली. सेंद्रीय खताचा कस लागल्याने ही फुले अधिक ताजे राहणारी व मोठ्या गेंदाची होती. स्थानिक बाजारपेठेत या फुलांना मागणी चांगली मिळू लागली. उन्हाळ्याच्या लग्न सराईत ही मागणी खूप अधिक होती. तसेच त्याला दरदेखील चांगला मिळायचा. व्यापारी मागणी करू लागले. खूप अधिक सुगंध व न गळणाऱ्या पाकळ्या हे या गुलाबाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. त्यासोबत तजेलदार रंगामुळे बाजारात त्याला मागणी चांगली मिळाली. निवृत्ती पाटील यांनी गुलाबजलदेखील तयार केले. त्याचाही सुगंध अधिक वेळ आसमंतात दरवळत असल्याने अनेकांनी त्यांच्याकडून गुलाबजल मागवले.

उन्हाळ्यात गुलाबाला सर्वाधिक भाव तर पावसाळ्यात भाव कमी मिळत होता. पण पावसाळ्यात फुले ही अधिक होती. वर्षभरातच त्यांना एकरभरातच तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. अजूनही फुले मिळत आहेत. रासायनिक खताचा शून्य खर्च व जैविक खतामुळे त्यांचा लागवड खर्च अगदी हजार रुपयापर्यंत झाला. त्यामुळे उत्पन्नाचा आकडा निव्वळ नफा ठरला. त्यांच्या गुलाबाला सोलापूरसह पुणे, चिपळूण, मुंबई, नांदेड आदी शहरातूनही मोठी मागणी होती.

ठळक बाबी

  • गायीच्या शेण व गोमुत्राचा पूर्ण वापर

  • जीवामृत व इतर जैविक खतांचा उपयोग

  • गुलाबाची गुणवत्ता, रंग व पाकळ्याचा टिकाऊपणा

  • गुलाबजलाची केली निर्मिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com