
Samruddha Panchayatraj’ initiative begins in Solapur district villages with leaders’ active participation.
Sakal
सोलापूर : जिल्ह्यातील १०२४ गावांमध्ये समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ शिरवळ (ता. अक्कलकोट) येथून करण्यात आला. यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती. हत्तूर (ता. दक्षिण सोलापूर) येथे आमदार सुभाष देशमुख, पंढरपूर तालुक्यातील तुंगत ग्रामपंचायतीत आमदार अभिजित पाटील यांच्या उपस्थितीत अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.