Solapur News : ग्रामीण पोलिसांकडून १३ लाखांची हातभट्टीची दारू नष्ट

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातील हातभट्टीच्या ठिकाणांवर व अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली. १५ दिवसांत तब्बल १३ लाख सात हजार ५० रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे
Solapur News
Solapur Newssakal

सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातील हातभट्टीच्या ठिकाणांवर व अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली. १५ दिवसांत तब्बल १३ लाख सात हजार ५० रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील अवैध दारूनिर्मिती व विक्रीवर कारवाई करण्यासाठी विशेष पथके नेमली आहेत. त्यात प्रत्येक पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षकांसह अंमलदारांची पथके आहेत.

दुसरीकडे उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी नियंत्रण कक्षातील पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे, करमाळा तालुक्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक कमलाकर पाटील, अक्कलकोट तालुक्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय जगताप व पंढरपूर आणि माळशिरस तालुक्यासाठी अनैतिक मानवी वाहतूक कक्षाचे पोलिस निरीक्षक बजरंग साळुंखे यांच्या नेतृत्वात विशेष पथके स्थापन केली आहेत.

या पथकांनी १५ दिवसांत मुळेगाव तांडा, भानुदास तांडा, गुळवंची तांडा, बक्षिहिप्परगा तांडा, तिल्हाळ, अक्कलकोटमधील तडवळ, भोसगा तांडा, नागूर तांडा, मुंढेवाढी, माळशिरस तालुक्यातील सव्हतगव्हाण, गुरसाळे, श्रीपूर, धर्मपुरी, चव्हाणवाडी आणि करमाळ्यातील शेळगाव, जेऊर, सुगाव, भाळवणी अशा ठिकाणी छापे मारून कारवाई केली.

Solapur News
Solapur loksabha constituency : जिल्ह्यातील आमदार उपरा कसे ? ; सुदर्शन यादव

४३० लिटर हातभट्टी अन्‌ २६ हजार ४५० लिटर रसायन नष्ट

सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकांनी अवघ्या १५ दिवसांत १३ लाखांहून अधिक रकमेची अवैध हातभट्टी व रसायन नष्ट केले. त्यात ४३० लिटर हातभट्टी व २६ हजार ४५० लिटर रसायन असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. आगामी काळात निवडणूक होईपर्यंत ही विशेष पथके कार्यरत राहणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com