esakal | Sangola: खड्ड्यांवरील ‘मीम्स’ सोशल मीडियात व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

छायाचित्र

सांगोला : खड्ड्यांवरील ‘मीम्स’ सोशल मीडियात व्हायरल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगोला : सध्या सोशल मीडियात रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवर शोलेमधील एका चित्राचा वापर करून ‘मीम्स’ तयार करून खड्ड्यांची खिल्ली उडविली जात आहे. सोशल मीडियावर याला तरुणाचा मोठा प्रतिसाद मिळत असून हे ‘मीम्स’ लाईक, शेअर, फॉरवर्ड केले जात आहेत.

रस्ता कोणताही असो तो नादुरुस्त झाल्यावर, रस्त्यावर खड्डे पडले की यावर मोठ्या प्रमाणात नकारात्मक टीकाही केली जाते. कारण दळणवळणाची साधने वाढल्याने रस्त्यांचा मोठा वापर होत आहे. एखाद्या खेडेगावाकडे जाणारा किंवा शहरातील विविध प्रभागातील जोडणाऱ्या रस्त्यांवर खड्डे पडले की विविध पक्षाचे नेतेमंडळी, शहरातील सत्ताधारी, विरोधक मंडळी यावर टिकाटिपणी करून विविध प्रकारची राजकीय आंदोलने करत असतात. आगामी सांगोला नगर परिषदेच्या निवडणुकांचे वारे जोरदार वाहू लागले आहे. त्यातच शहरातील विविध रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांसाठी शोलेमधील एका दृश्‍यातील चित्राचा उपयोग करून खड्ड्यांवर मोठ्या प्रमाणात नकारात्मक टीका केली जात आहे.

हेही वाचा: मनोहर भोसलेला पुन्हा चार दिवसांची कोठडी

‘शोले’ चित्रपटातील शेवटच्या भागामध्ये अमिताभ बच्चनला लागलेली गोळी व त्यांना जवळ घेतलेल्या धर्मेंद्रचे चित्रपटातील चित्र वापरले जात आहे. चित्रामध्ये धर्मेंद्रचा तोंडी ‘भावा तू कुठे पडलास?’ त्यावर अमिताभच्या तोंडुन त्या रस्त्याचे नाव दिले जाते. या मीम्सची सध्या सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणावर चर्चा होत आहेत. हे मीम्स अनेकजण लाईक, शेअर, फॉरवर्ड केले जात आहेत.

निवडणुकांच्या तोंडावरच अशाप्रकारे रस्त्यावर पडणाऱ्या खड्ड्यांची व विविध प्रश्नांची चर्चा होणे गरजेचे आहे. पाच वर्षे झोपेत असलेले नगरसेवक मतांचा जोगवा मागण्यासाठी लवकरच येणार आहेत. परंतु, त्याअगोदरच अशा प्रकारे सोशल मीडियाद्वारे नागरिकांच्या अडचणी समोर येणे गरजेचे आहे

- प्रशांत दौंडे, कापड व्यापारी

loading image
go to top