
सोलापूर: जि. प.च्या दोन हजार ७७३ शाळांमधील सुमारे एक हजार वर्गखोल्या धोकादायक आहेत. त्यापैकी ५७० वर्गखोल्या पाडकामास परवानगी मिळाली, पण निधीअभावी नव्या वर्गखोल्यांचे बांधकामच झालेले नाही. त्यामुळे सध्या पहिली ते चौथीपर्यंतचे विद्यार्थ्यांना एकाच वर्गात बसवून शिकविले जात आहे. दुसरीकडे प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही बंधनकारक करूनही जिल्हा परिषदेच्या दोन हजार २४८ शाळांमध्ये कॅमेरेच बसविलेले नाहीत. निधी मिळेल तसे कॅमेरे बसविले जातील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.