
उ.सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळांमध्ये डाळिंबानंतर ड्रॅगन फ्रूटची आवक होत आहे. सोमवारी बाजार समितीच्या आवारात २१२ क्विंटल फळाची आवक झाली होती. यातून बाजारात दहा लाख रुपयांची उलाढाल झाली. नुकतेच बाजार समितीने ड्रॅगन फ्रूटला नियमन प्रणालीत घेतले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या व्यापारात संरक्षण मिळणार आहे.