

Chilly mornings return to Solapur as temperature dips to 18.6°C; residents feel the first real touch of winter.
Sakal
सोलापूर: सोलापूर शहर व परिसरात थंडीला सुरुवात झाली आहे. गेल्या २४ तासात १८.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. रात्री व पहाटेच्या सुमारास थंडीचा कडका वाढू लागला आहे. पुढील तीन दिवस किमान तापमान १७ ते १८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. किमान तापमानात घट झाल्याने पुढील तीन दिवस सोलापूरकरांसाठी हुडहुडी भरविणारे असणार आहेत.