

Solapur wakes up to chilly mornings as temperature dips to 15.6°C; IMD predicts colder days ahead.
Sakal
सोलापूर : सोलापूर शहर व परिसराच्या वातावरणात शनिवारपासून (ता. ८) कमालीचा बदल झाला आहे. किमान तापमानात घट झाल्याने वातावरणात थंडीचा जोर वाढला आहे. शनिवारी १८.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाल्यानंतर आज सोलापूरच्या किमान तापमानात घट झाली आहे. आज सोलापुरात ३१.८ अंश सेल्सिअस कमाल तर १५.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.