gambling raid
sakal
कोळा : सांगोला तालुक्यातील कोळा येथील जुगार अड्ड्यावर प्रशिक्षणार्थी आयपीएस प्रशांत डगळे यांच्या नेतृत्वातील पथकाने रविवारी (ता. ९) रात्री पावणेनऊच्या सुमारास छापा टाकला. यात जुगार खेळणाऱ्या ३३ जणांना ताब्यात घेतले आहे. सुमारे पाच लाखांवर रोकड व २५ वाहने जप्त केली आहेत. पोलिसांना पाहताच तिघेजण पसार झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे.