सोलापूर : सुट्यांसाठी एसटीच्या ५० जादा गाड्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुट्यांसाठी एसटीच्या ५० जादा गाड्या

सोलापूर : सुट्यांसाठी एसटीच्या ५० जादा गाड्या

सोलापूर: दोन वर्षे कोरोना महामारीमुळे आणि त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लालपरीची चाके थांबली होती. मात्र संपानंतर सर्व कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाल्याने एसटीची सेवा पूर्ववत झाली आहे. उन्हाळा सुटीमध्ये प्रवाशांना आपल्या गावी जाता यावे, हवे तेथे प्रवास करता यावा यासाठी सोलापूर विभागाकडून २७ एप्रिल ते १५ जूनपर्यंत एसटीच्या ५० जादा बस सोडण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.

सहा महिन्यांपासून विविध मागण्यांसह एसटी विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य केल्यानंतर कर्मचारी कामावर परतले आहेत. न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा कामावर येण्याचा निर्णय घेतला. सोलापूर विभागातील मोठ्या संख्येने वाहक- चालक कामावर आले असून, त्यामुळे सोलापूर विभागानेही उन्हाळी सुट्यांमध्ये गावाकडे अथवा पर्यटन क्षेत्राकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये त्याचबरोबर उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टिकोनातून कंबर कसली आहे. सोलापूर विभागातील नियमित गाड्यांव्यतिरिक्त ५० अतिरिक्त गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून, यातून प्रवाशांची वाहतूक केली जात आहे. त्याचबरोबर महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.

अक्कलकोट आगार

अक्कलकोट-चिंचवड, अक्कलकोट-शिर्डी, अक्कलकोट-स्वारगेट

करमाळा आगार

करमाळा-स्वारगेट (सात फेऱ्या)

अकलूज आगार

अकलूज-ज्योतिबा (सातारा)

सांगोला आगार

सांगोला-स्वारगेट (तीन फेऱ्या), पंढरपूर-कोल्हापूर

मंगळवेढा आगार

मंगळवेढा-स्वारगेट, मंगळवेढा-चिंचवड

उन्हाळी जादा वाहतूक बसचे नियोजन

सोलापूर आगार

सोलापूर-जत, सोलापूर-हिंजवडी, सोलापूर-वाकड, सोलापूर-पुणे

सोलापूर आगार

सोलापूर-जत, सोलापूर-हिंजवडी, सोलापूर-वाकड, सोलापूर-पुणे

बार्शी आगार

बार्शी-तासगाव, बार्शी-राजगुरुनगर, बार्शी-स्वारगेट (दोन फेऱ्या), बार्शी-निगडी, बार्शी-सज्जनगड

Web Title: Solapur St Trains Holidays

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top