Solapur : केंद्र सरकारच्या पीकनिहाय निकषापेक्षा दुप्पट नुकसान भरपाई देण्याचे राज्य सरकारचे धोरण : आ. शहाजीबापू पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Shahjibapu Patil

Solapur : केंद्र सरकारच्या पीकनिहाय निकषापेक्षा दुप्पट नुकसान भरपाई देण्याचे राज्य सरकारचे धोरण : आ. शहाजीबापू पाटील

सांगोला : तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या चार मंडळ व इतर मंडळामध्येही नुकसान झालेल्या पिकांचे सर्व पंचनामे केले जातील. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे दहा गुंठेही जमीन राहणार नाही. केंद्र सरकारच्या पीकनिहाय निकषानुसार नुकसान भरपाई जाहीर केली जाते त्यापेक्षा दुप्पट नुकसान भरपाई देण्याचे शिंदे - फडणवीस सरकारचे देण्याचे धोरण असल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी सांगितले. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना पंचनामेबाबत आमदार शहाजीबापू पाटील यांनी सूचना केल्या.

हेही वाचा: Solapur : रिक्षांवर उद्यापासून ‘आरटीओ’ची कारवाई

सांगोला तालुक्यातील सर्वाधिक अतिवृष्टी झालेल्या संगेवाडी मंडळमधील संगेवाडी व मांजरी या गावात नुकसानग्रस्त पिकांचे पाहणी करण्यासाठी आमदार शहाजी बापू पाटील आले होत. यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार अभिजीत सावर्डे - पाटील, तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, मंडलाधिकारी बाळासाहेब कदम, मंडळ कृषी अधिकारी प्रविण झांबरे, कृषिसेवक अलका चव्हाण यांच्यासह मंडळातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा: Solapur : सोलापूरची माळराने पक्ष्यांनी गजबजली

यावेळी बोलताना आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले की, तालुक्यातील चार मंडळांमध्ये अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले आहे. ही चार मंडळ सोडूनही इतर मंडळांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे या चार मंडळासह इतर मंडळांमध्येही ज्या पिकांचे नुकसान झाले आहे त्या सर्व पिकांचे पंचनामे करण्यात येतील.

हेही वाचा: Solapur : सोलापूरची माळराने पक्ष्यांनी गजबजली

कोणताही शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहणार नाही याची दखल निश्चितपणे घेतली जाईल. केंद्र सरकारचे पीकनिहाय जे निकष आहेत त्यापेक्षा दुप्पट नुकसान भरपाई देण्याचे शिंदे - फडणवीस सरकारचे धोरण आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखे परिस्थिती तालुक्यातील फक्त चार मंडळांमध्येच आहे.

हेही वाचा: Solapur : भीमाची पहिली उचल 2 हजार 600 रुपये राहील : खा धनंजय महाडिक

ओला दुष्काळासाठीचे अनेक नियम व निकष आहेत. आम्ही तशी मागणी करू परंतु शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे यासाठी मी निश्चित प्रयत्न करेन. पंचनामे करण्यापासुन कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही याबाबत दखल घ्यावी अशा सूचनाही आमदार शहाजी बापू पाटील यांनी आधिकाऱ्यांना केल्या.

हेही वाचा: Solapur : ऊस दरासाठी शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

मी पाठपुरावा करतो, तुम्ही काळजी घ्या

नुकसान झालेल्या पिकांना शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी मी अधिकारी व शासनदरबारी पाठपुरावा निश्चितपणे करेन. परंतु तुम्हीही आधिकाऱ्यांकडून नुकसान पिकांचे पंचनामे करुन घेण्याची काळजी घ्या असे आवाहन आमदार शहाजी बापू पाटील यांनी शेतकऱ्यांना केले.