Former MP Raju Shetti
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ऊसदरप्रश्नी दोन दिवस वाट पाहू, त्यानंतर एकेका साखर कारखान्यांचे ऊस गाळप बंद पाडू. यासाठी पदाधिकारी-कार्यकर्त्यांची भरारी पथके स्थापणार असून काळ्याबाजारात जाणाऱ्या साखर वाहतुकीच्या गाड्या अडवू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी दिला.