

Solapur Sugarcane Farmers Demand Rs 3500 First Installment Raju Shetti Warns of Highway Blockade and Rail Roko Protest
esakal
-राजकुमार शहा
मोहोळ: सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदार गुरुवार ता 19 रोजीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बोलविलेल्या ऊस दरा बाबत च्या बैठकीत काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले असून, उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान माजी खासदार तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या भूमिकेकडे ही जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे. राजू शेट्टी यांच्या आवाहना नुसार शेतकऱ्यांनी आंदोलना साठी सोलापूरला जाण्याची तयारी सुरू केली आहे.