सोलापूर : बार्शी न्यायालयात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

मुलास आत्ताच्या आत्ता सोडले नाही तर पेटवून घेईन
 suicide woman
suicide woman sakal

बार्शी : माझ्या मुलास पोलिसांनी खोटी केस करुन जेलमध्ये टाकले आहे. मुलास आत्ताच्या आत्ता सोडले नाही तर पेटवून घेईन असे म्हणत पेटवून घेण्याचा प्रयत्न एका महिलेने फौजदारी न्यायालयाच्या दालनासमोर केला. त्यामुळे बार्शी शहर पोलिस ठाण्यात तिच्या विरोधात गुन्हा दाखल करुन पोलिसांनी तिला अटक केली आहे.

अलका अशोक पवार (वय 50 रा. ठोंबरेनगर, मुरुड, जि. लातूर) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. सहायक अधीक्षक रमेश मैसूर यांनी फिर्याद दाखल केली. ही घटना शुक्रवारी (ता. १३) दुपारी दोनच्या दरम्यान घडली. न्यायदंडाधिकारी यांच्या दालनासमोर अलका पवार ही महिला मोठ्या-मोठ्याने आरडा-ओरड करीत होती. त्यावेळी तिने आणलेल्या पिशवीतून नारंगी द्रव्य असलेली प्लास्टिकची बाटली व काडीपेटी काढली. बाटलीचे टोपण उघडून पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला.

यावेळी तेथे उपस्थित असलेले सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर उदार व महिला पोलिसांनी बाटली, काडीपेटी हिसकावून घेत तिला आत्महत्येपासून परावृत्त केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस व न्यायालयाच्या शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सहायक पोलिस निरीक्षक स्वप्निल इज्जपवार करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com