

Solapur News 11 Suspected Fake Teacher Voters Face Police Case as Signature and Stamp Samples Sent for Forensic Examination
sakal
सोलापूर : शिक्षक आमदारकीसाठी प्रसिद्ध झालेल्या मतदारयादीत ११ जण शिक्षक नसताना मतदार यादीत असल्याचे समोर आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशावरून त्या सर्वांच्या अर्जांची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी ते अकरा जण शिक्षक नसल्याचे उघड झाले. बार्शीतील गटशिक्षणाधिकारी गजानन बाजड यांच्या फिर्यादीवरून ११ जणांविरूद्ध बार्शी शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.