सोलापूर : बसस्थानकात चोरटे सक्रिय

चोर न सापडल्याने पोलिसांची निष्क्रीयता झाली उघड
Theft
Theftesakal

सोलापूर : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बसस्थानकामध्ये लग्नसराई, उन्हाळा सुट्टी यामुळे प्रवाशांची गर्दी वाढली आहे. मात्र, मागील काही दिवसांमध्ये पाकीट चोरी, दागिने, पर्स, लॅपटॉप चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरटे सक्रिय झाले असताना पोलिसांकडून मात्र अद्यापही तपासात निष्क्रियता दाखवली जात आहे.

मागील एक महिन्यापासून पोलिस प्रशासनाने अवैध धंद्याविरुद्ध व चोरी करणाऱ्या विरुद्ध कडक मोहीम हाती घेतली आहे. ग्रामीण भागातील अवैध वाळू उपशावर, जुगार अड्ड्यावर मोठ्या कारवाया करण्यात आल्या आहेत. एकीकडे ही बाब कौतुकास्पद असली तरी दुसरीकडे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बसस्थानकात दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढल्या आहेत. विशेषतः पंधरा दिवसांपासून येथे लाखोंच्या ऐवजांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे.

मागील दोन दिवसात बसस्थानकात एकाच दिवशी चार लॅपटॉप चोरीच्या घटना घडल्या आहेत. मात्र याबाबत फर्याद देऊनही काही उपयोग होत नसल्याने अशा चोरट्यांवर केव्हा कारवाई होणार असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला आहे. ज्यांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे, त्यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. मात्र, अद्यापही त्या चोरट्यांचा शोध लागला नाही. भर दिवसा मोबाईल, लॅपटॉप, रोख रक्कम चोरून नेल्याच्या घटना घडल्याने प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली आहे. या घटना व्यतिरिक्त मोबाईल, दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com