

Tilak Chowk Solapur Building Collapse Highlights Civic Safety Concerns After Three to Four Notices Over Dangerous Structure
sakal
सोलापूर : शहरातील वर्दळीच्या टिळक चौकात गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास जीर्ण इमारतीचा काही भाग कोसळला. सुदैवाने त्यावेळी रस्त्यावर नागरिकांची वर्दळ नसल्याने मोठी दुर्घटना टळली. या इमारतीच्या धोकादायक अवस्थेबाबत महापालिकेने संबंधित घरमालक शहा यांना तीन ते चार वेळा नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, इमारत पाडण्याची कार्यवाही झाली नसल्याने महापालिकेच्या नोटिसींकडे दुर्लक्ष झाल्याचे समोर आले आहे.