

Maharashtra’s Solapur Launches Landmark 8% DME-LPG Blending Project
sakal
सोलापूर: बालाजी अमाईन्सने चिंचोळी औद्योगिक वसाहतीत डायमिथाईल इथर (डीएमई) उत्पादन सुरू केले आहे. या प्रकल्पाची दररोजची क्षमता २७५ मे. टन आहे. युद्धजन्य परिस्थितीत इंधनटंचाईच्या पार्श्वभूमीवर एलपीजी सिलिंडरमध्ये त्याचा ८ टक्क्यांपर्यंत मिश्रण घटक म्हणून वापर करता येतो. तसेच व्यावसायिक वापरासाठीही त्याचा थेट वापर करता येतो. व्यावसायिक स्तरावर ‘डीएमई’चे उत्पादन करणारी बालाजी अमाईन्स ही भारतातील एकमेव कंपनी ठरल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.