Bullet Rider Assaults Traffic Police in Solapur : लायसन्स, नंबरप्लेट नाही, मॉडिफाइड सायलेन्सर, तरीही पोलिसाला खल्लास करण्याची दिली धमकी

Illegal Bullet Rider Caught Without Number Plate in Solapur : सोलापुरात नंबरप्लेट व परवाना नसलेल्या बुलेटस्वाराने वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की करत धमकी दिली. मॉडिफाइड सायलेन्सरमुळे कारवाई करत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
Bullet rider assaults traffic police in Solapur

Bullet rider assaults traffic police in Solapur

esakal

Updated on

सोलापूर : अक्कलकोट रोडवरील महालक्ष्मी चौकातून बुलेटस्वार डबलसीट येत होता. त्याच्या गाडीला नंबरप्लेट नव्हती, सायलेन्सर मॉडिफाइड केलेला होता. त्याच्याकडे लायसन्स व अन्य कागदपत्रेदेखील नव्हती. त्याबद्दल विचारणा केल्यावर त्याने धक्काबुक्की करून वायरलेस वॉकीटॉकी व मोबाईल फेकून (Solapur Traffic Crime) दिला. उद्धटपणे बोलून ‘तुला खल्लास करतो’ अशी धमकी बुलेटस्वाराने दिल्याची फिर्याद वाहतूक अंमलदार अंबादास शिवशरण यांनी जेलरोड पोलिस ठाण्यात दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com