

Solapur Traffic Cop Viral Video
Esakal
वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून दंड आकारला जातो. मात्र सोलापुरात चक्क भररस्त्यात वाहनचालकाकडून रोख पैसे घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. सोलापूर-पुणे रोडवरील जुना पूना नाका येथे वाहतूक पोलिसाने चारचाकी चालकाकडून पैसे घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे वाहतूक पोलिसांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.