
मंगळवेढा : नंदेश्वर-झरेवाडी (ता. मंगळवेढा) परिसरात हॉटेल व्यवसायासाठी खाद्यपदार्थ करत असताना गॅसचा पाईप लिक झाल्याने घरगुती गॅसचा स्फोट होऊन दोन लहान सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला असून, अन्य तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी सोलापूर येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.