

Solapur Accident
sakal
सोलापूर : वडील सरकारी दवाखान्यात आरोग्य सेवक, आई घरकाम, दोघांनीही पहिला मुलगा झाल्याने त्याचे नाव प्रथमेश ठेवले. आई-वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी त्याने डी-फार्मसीचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यावर गावी बागायती शेती, कुटुंबात एकुलता एक असल्याने प्रथमेश शेती करण्यासाठी गावी आला. पण, दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या अपघातात २५ नोव्हेंबरला प्रथमेश योगिनाथ घोडके (वय २४, रा. काटगाव, ता. तुळजापूर) याचा मृत्यू झाला.