सोलापूर : गणवेश पुरवठ्याचा कालावधी तिपटीने वाढला

स्वातंत्र्यदिनापर्यंत कायम राहणार पेच
School Uniforms
School Uniformsesakal

सोलापूर : गणवेश निर्मितीचा प्रश्न आता अधिकच व्यापक झाला असून, विशिष्ट डिझाईन निश्चित केलेल्या गणवेशाच्या बाबतीत अडचणी वाढल्या आहेत. कापड पुरवठादारांकडून पुरवठ्याचा कालावधी तिपटीने वाढला आहे. मागील महिन्यात सुरवातीला या प्रश्नाची अडचण समोर आली. त्यानंतर आता राज्य व देशपातळीवर देखील ही समस्या गंभीर होऊ लागली आहे.

विशिष्ट डिझाईन निश्चित केलेल्या गणवेशाचा कापड पुरवठा करणे अडचणीचे झाले आहे. भिवंडी, सुरत, मुंबई, भिलवाडा येथून गणवेशाच्या निर्मितीसाठी कापड पुरवठा केला जातो. पण या प्रमुख शहरांतून ऑर्डर दिलेले कापड गणवेश निर्मितीसाठी वेळेवर मिळेनासे झाले आहे. तसेच होणारा पुरवठा देखील मागणीच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. पूर्वी मागणी केलेले कापड ३० दिवसांत मिळत असे. तेच कापड आता ६० ते ९० दिवसांच्या अंतराने म्हणजे दोन ते तीन महिन्यांनी मिळत आहे.

हे कापड मिळाल्यानंतर कुशल कारागिराकडून शिलाईचे काम करून घेण्याचे काम करावे लागते. या कामगारांची देखील कमतरता आहे. त्यामुळे हा प्रश्न अधिकच बिकट बनतो आहे. देशपातळीवर गणवेशाचे कापड तयार करणाऱ्या मिलकडून पुरवठा कमी झाल्याने शाळांना वेळेत गणवेशाचा पुरवठा केला जात नाही. तसेच शाळा, महाविद्यालये व इतर संस्थांनी स्वातंत्र्यदिनापर्यंत म्हणजे १५ ऑगस्टपर्यंत त्यांची मागणी पूर्ण केली जाईल याच पद्धतीने यावर्षी गणवेश उपलब्धतेचे नियोजन करावे, अशी सूचना गणवेश पुरवठादारांकडून केली जात आहे.

ठळक...

  • मुंबई, सुरत, भिलवाडा, भिवंडीतून गणवेशाचे कापड लवकर मिळेना

  • कापड पुरवठ्याचा कालावधी ३० दिवसांऐवजी ६० ते ९० दिवसांवर

  • सोलापुरात १५० गणवेश रिटेलर्स

  • मागणीच्या तुलनेत ५० टक्के पुरवठा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com