esakal | परीक्षेनंतर दोनच दिवसांत निकाल जाहीर ! सोलापूर विद्यापीठाची कामगिरी
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur University

परीक्षा संपताच दोन दिवसांत निकाल जाहीर करत विद्यापीठाने अन्य विद्यापीठांच्या तुलनेत उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.

परीक्षेनंतर दोनच दिवसांत निकाल जाहीर! सोलापूर विद्यापीठाची कामगिरी

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या (Punyashlok Ahilya Devi Holkar Solapur University) प्रथम वर्षाची प्रथम सत्र परीक्षा 23 मे रोजी संपली. त्यानंतर विद्यापीठाने 26 अभ्यासक्रमांचे निकाल अवघ्या दोनच दिवसांत म्हणजे मंगळवारी (ता. 25) जाहीर केले. बीए (BA), बीकॉम (B. Com.), एमकॉम (M. Com.), एमए (MA) यासह अन्य अभ्यासक्रमांचा या निकालात समावेश आहे. (Solapur University announced the results within two days after the examination)

हेही वाचा: जिल्ह्यातील रुग्णांची दीड लाखाकडे वाटचाल ! नव्याने वाढले 965 रुग्ण

कोरोनाच्या (Covid-19) दुसऱ्या लाटेमुळे विद्यापीठाला दुसऱ्यांदा परीक्षेचे नियोजन बदलावे लागले. ऑफलाइन परीक्षा घेण्याचे नियोजन असतानाही कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले. प्रथम वर्षाच्या 23 हजार 960 विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. ऑनलाइन परीक्षा झाल्याने निकालासाठी फार वेळ लागला नाही. परीक्षा संपताच दोन दिवसांत निकाल जाहीर करत विद्यापीठाने अन्य विद्यापीठांच्या तुलनेत उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. ही ऑनलाइन परीक्षा जवळपास अडीच हजार विद्यार्थी देऊ शकले नाहीत. त्यांच्या अडचणींमुळे त्यांना परीक्षा देता आली नसल्याने त्यांची परीक्षा आता जुलै व ऑगस्टमध्ये घेण्याचे नियोजन असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. विकास कदम यांनी दिली. जुलै- ऑगस्टमधील सत्र परीक्षाही ऑनलाइन पद्धतीनेच घेण्याचा ठराव परीक्षा मंडळाने केला आहे. त्यानंतर सप्टेंबर 2021 मध्ये विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा: कागदपत्रे दाखवा, दंड भरा व लॉकडाउनमध्ये जप्त केलेली वाहने घेऊन जा!

प्रात्यक्षिक परीक्षेचा प्राचार्यांना अधिकार

विज्ञान, फार्मसी या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा विद्यापीठाच्या माध्यमातून घेतली जात होती. मात्र, कोरोनामुळे विद्यापीठाला आता प्रात्यक्षिक परीक्षा घेणे शक्‍य नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा आता महाविद्यालय स्तरावर होणार असून त्याच्या नियोजनचा अधिकार संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांना देण्याचा निर्णय पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने घेतला आहे.

कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम वर्षातील 23 हजार 960 विद्यार्थ्यांची परीक्षा सुरळीत पार पडली. 95 टक्‍के विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा दिली असून त्यातील 26 अभ्यासक्रमांचा निकाल देखील मंगळवारी विद्यापीठाने जाहीर केला आहे. आगामी सत्र परीक्षाही याच पद्धतीने होतील.

- डॉ. विकास कदम, संचालक, परीक्षा व मूल्यमापन विभाग