esakal | जिल्ह्यातील रुग्णांची दीड लाखाकडे वाटचाल ! नव्याने वाढले 965 रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Update

ग्रामीणमध्ये दररोज दहा हजारांवर तर शहरात तीन हजारांपर्यंत कोरोना टेस्ट होत होत्या. मात्र, दोन दिवसांपासून त्यात घट झाली असून त्यामागे नेमके कारण काय, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे.

जिल्ह्यातील रुग्णांची दीड लाखाकडे वाटचाल ! नव्याने वाढले 965 रुग्ण

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : शहर- जिल्ह्यात 965 रुग्ण वाढले असून दिलासादायक बाब म्हणजे 3 हजार 288 रुग्ण कोरोनातून (Covid-19) बरे होऊन घरी परतले आहेत. तर ग्रामीणमधील 22 व शहरातील सहा रुग्णांचा कोरोनामुळे (Corona) मृत्यू झाला आहे. कोरोनाची दुसरी लाट ग्रामीण भागासाठी चिंताजनक बनली आहे. मागील 40 दिवसांत जवळपास 60 हजार रुग्ण वाढले आहेत. आतापर्यंत ग्रामीणमधील एक लाख 18 हजार 913 व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आढळल्या असून शहरातील 27 हजार 964 व्यक्‍तीही कोरोनाबाधित आढळल्या. एकूण रुग्णसंख्या आता एक लाख 46 हजार 877 झाली असून त्यापैकी एक लाख 31 हजार 644 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. (The number of patients in the district is around one and a half lakh)

हेही वाचा: कागदपत्रे दाखवा, दंड भरा व लॉकडाउनमध्ये जप्त केलेली वाहने घेऊन जा!

चिंतेची बाब म्हणजे शहरातील 32 वर्षीय महिलेचा तर ग्रामीणमध्ये वैराग (ता. बार्शी) येथील 38 वर्षीय तरुणाचा, मार्डी (ता. उत्तर सोलापूर) येथील 26 वर्षीय तरुणाचा आणि वरवडे (ता. माढा) येथील 32 वर्षीय महिलेचा कोरोनाने बळी घेतला आहे. सद्य:स्थितीत ग्रामीणमधील दहा हजार 766 तर शहरातील 639 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज अक्‍कलकोट तालुक्‍यातील तिघांचा मृत्यू झाला असून 30 रुग्ण वाढले आहेत. बार्शीत 132 रुग्ण वाढले असून चौघांचा तर करमाळ्यात 69 रुग्ण वाढले असून एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच माढ्यात 109 रुग्ण वाढले असून तिघांचा तर माळशिरस तालुक्‍यात सर्वाधिक 237 रुग्ण वाढले असून दोघांचा कोरोनाने बळी घेतला आहे. दक्षिण सोलापुरात सात, मंगळवेढ्यात 50, पंढरपूर तालुक्‍यात 120 रुग्ण वाढले आहेत. मोहोळ तालुक्‍यात 47, सांगोल्यात 105 रुग्ण वाढले असून प्रत्येकी दोघांचा मृत्यू झाला आहे. उत्तर सोलापुरात 18 रुग्ण वाढले असून पाच रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्णसंख्या घटल्याने आता बऱ्याच रुग्णालयात बेड शिल्लक असल्याची स्थिती आहे. त्यामुळे रुग्णांनी आजार अंगावर न काढता रुग्णालयातून उपचार घ्यावेत. सर्वांनी मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

हेही वाचा: वीज कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे सर्वसामान्यांचा निघतोय घाम !

टेस्टिंग कमी का केल्या?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गावोगावी संशयितांच्या टेस्टिंग वाढविल्यानंतर अनेक छुपे रुग्ण समोर आले. त्यांच्या माध्यमातून होणारा संसर्ग रोखण्यात काही प्रमाणात यश मिळाले. शहरात त्याचा मोठा लाभ झाला. आणखी या लाटेचा धोका संपलेला नसतानाही शहर व ग्रामीण भागातील कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी करण्यात आल्याचे चित्र आहे. ग्रामीणमध्ये दररोज दहा हजारांवर तर शहरात तीन हजारांपर्यंत कोरोना टेस्ट होत होत्या. मात्र, दोन दिवसांपासून त्यात घट झाली असून त्यामागे नेमके कारण काय, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे.