Solapur News: विद्यापीठाचे २७८ कोटींचे बजेट! वृक्ष संवर्धन व स्वच्छतेसाठी सव्वा कोटी, आणखी तरतुदी जाणून घ्या

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या २०२३-२४ च्या एकूण २७८ कोटी १६ लाख ९६ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकास मंगळवारी (ता. १४) अधिसभेने एकमताने दुरुस्तीसह मंजुरी दिली. या अंदाजपत्रकात ३७७ कोटी ७६ लाख २० हजार ५०० रुपये इतकी तूट दर्शविण्यात आली आहे.
solapur univercity
solapur univercitysakal

Solapur News : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या २०२३-२४ च्या अंदाजपत्रकात २४० कोटी ४० लाख ७५ हजार ५०० रुपयांची अपेक्षित रक्कम जमा धरून एकूण २७८ कोटी १६ लाख ९६ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकास मंगळवारी (ता. १४) अधिसभेने एकमताने दुरुस्तीसह मंजुरी दिली. या अंदाजपत्रकात ३७७ कोटी ७६ लाख २० हजार ५०० रुपये इतकी तूट दर्शविण्यात आली आहे.

विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात मंगळवारी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अधिसभेची बैठक पार पडली. या बैठकीत विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी श्रेणीक शाह यांनी अंदाजपत्रक सादर केले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. राजेश गादेवार यांच्यासह अधिसभेचे सदस्य उपस्थित होते.

सभेचे सचिव म्हणून प्रभारी कुलसचिव डॉ. विकास घुटे यांनी काम पाहिले. देखभाल, वेतन, ऋण आणि अनामत, योजना अंतर्गत विकास- भाग एक तसेच योजनांअंतर्गत विकास- भाग दोन अशा पाच टप्प्यांमध्ये अंदाजपत्रक सादर झाले.

यंदाच्या अंदाजपत्रकात विद्यार्थ्यांचा विकास, संशोधन व वृक्ष संवर्धनासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. मागील वर्षीप्रमाणे यावेळी अधिसभेत गोंधळ झाला नाही. सदस्यांनी काही सूचना-दुरुस्ती सुचवली असून त्यानुसार कार्यवाही केली जाणार आहे.

मोहिते-पाटलांचे अनुमोदन; प्रा. गायकवाडांकडून सरकारचे अभिनंदन

व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या पद्मजादेवी मोहिते-पाटील यांनी अंदाजपत्रक सर्वंकष असून त्यामुळे विद्यापीठाच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करून अनुमोदन दिले.

विद्यापीठ स्थापनेनंतर राज्य सरकारने पहिल्यांदाच ५५ कोटी रुपयांचा निधी दिल्याने सरकारच्या अभिनंदनाचा ठराव सिनेट सदस्य प्रा. सचिन गायकवाड यांनी मांडला. तो ठराव बहुमताने मंजूर केला.

अंदाजपत्रकातील ठळक बाबी...

  • संशोधनाला चालना मिळावी, उद्योजक निर्माण व्हावेत, यासाठी उभारलेल्या इनक्युबेशन सेंटरसाठी एक कोटी

  • ‘सीड मनी’ संशोधन उपक्रमास ३० लाखांची तर ‘कमवा व शिका’साठी साडेबारा लाखांची तरतूद

  • विद्यापीठातील शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय प्रतिपूर्तीसाठी १५ लाख रुपयांची तरतूद

  • मराठी भाषा गौरव दिनासाठी आठ लाख तर विद्यापीठ आयएसओ मानांकनासाठी पाच लाख रुपये

  • विद्यापीठातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कार्यशाळा व परिसंवादासाठी दहा लाखांची तरतूद

  • परदेशी विद्यापीठासोबतच्या संशोधनासाठी नऊ लाखांची तर शास्त्रीय उपकरण केंद्रासाठी ३ कोटी रुपये

  • ‘संशोधन शिष्यवृत्ती’ला व विद्यापीठातील ४० गरीब विद्यार्थ्यांना ‘मोफत पुस्तके’ उपक्रमासाठीही भरीव तरतूद

वृक्ष संवर्धन व स्वच्छतेसाठी सव्वा कोटी

गोरगरीब विद्यार्थ्यांच्या ‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत विद्यापीठाने अवघी साडेबारा लाखांची तरतूद केली. पण, दुसरीकडे विद्यापीठाच्या कॅम्पसमधील झाडांच्या संवर्धनासाठी तब्बल एक कोटी २० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

त्यावेळी शासनाच्या मार्गदर्शनानुसारच एवढी तरतूद केल्याचे अंदाजपत्रकात नमूद करण्यात आले. तसेच विद्यापीठ परिसरातील स्वच्छतेसाठी पाच लाखांची अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे. हे विशेष.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com