Solapur : विजयदादांचा नकार, कुचन यांना संधी,जयंतीनिमित्त इंदिरा गांधी यांच्या सोलापुरातील सभेचा किस्सा

लोकसभा अजून लांब असल्याने मोहिते-पाटील यांनी आपण विधानसभेला इच्छुक असल्याचे सांगितले
indira gandhi
indira gandhi esakal

सोलापूर : स्व. इंदिरा गांधी सोलापूर दौऱ्यावर आल्या असता, सोलापूरच्या सभेत भाषण संपल्यानंतर पुन्हा व्यासपीठावर जाऊन विजयसिंह मोहिते-पाटील यांचे लोकसभेचे तिकीट जाहीर करणार होत्या. मात्र, लोकसभा अजून लांब असल्याने मोहिते-पाटील यांनी आपण विधानसभेला इच्छुक असल्याचे सांगितले. अन्यथा सोलापूरच्या सभेतच लोकसभेचा उमेदवार इंदिरा गांधी जाहीर करणार होत्या. त्यानंतर ही संधी गंगाधरपंत कुचन यांना मिळाली, अशी आठवण इंदिरा गांधी जयंतीच्या निमित्ताने ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितली.

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे देशभर दौरे सुरू होते. रत्नागिरी येथे त्या विमानाने आल्या होत्या. तेथून कोल्हापूर येथे आल्यानंतर तेथून सोलापूरला आणण्यासाठी स्वत: विजयसिंह मोहिते-पाटील गेले होते. सोलापूर व पंढरपूर येथे इंदिरा गांधी यांचे जंगी स्वागत झाले होते. यावेळी सोलापूरच्या कार्यकर्त्यांनी लोकसभेसाठी तत्कालीन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते-पाटील यांचे नाव सुचविले.

indira gandhi
Health Tips : लवकर म्हातारे व्हायचं नसेल तर भोपळा खा, डिप्रेशनपासूनही वाचवतो अन् ताजेपणा देतो

यावर आपण सभेतच हे नाव जाहीर करूयात म्हणून श्रीमती गांधी व्यासपीठाकडे निघाल्याही होत्या. मात्र, आपल्याला एकदा विधानसभा लढविण्याची इच्छा आहे. त्यानंतर लोकसभेवर येईन, अशी इच्छा व्यक्त केल्याने खासदार होण्याची संधी मोहिते-पाटील यांच्या सांगण्यावरूनच गंगाधरपंत कुचन यांना मिळाली होती. दक्षिण सोलापूरचे तत्कालीन आमदार वि. गु. शिवदारे यांनी या सभेचे आयोजन केले होते.

indira gandhi
Uric Acid Control Tips : युरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्यासाठी ‘या’ भाज्यांचा करा आहारात समावेश

७२ च्या सभेला ५० हजार नागरिकांची उपस्थिती

सोलापूर जिल्ह्यात १९७२ मध्ये दुष्काळ पडला होता. त्यावेळी श्रीमती गांधी सोलापूर दौऱ्यावर आल्या होत्या. आचेगाव (ता.दक्षिण सोलापूर) या ठिकाणी त्यांची जाहीर सभा झाली. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पी. के. सावंत, महसूलमंत्री भाऊसाहेब वर्तक, संपर्कमंत्री शरद पवार त्यांच्या समवेत होते. सकाळी आठ वाजून ५५ मिनिटांनी इंदिरा गांधी यांचे आगमन झाले. त्यांच्या सभेसाठी जिल्हाभरातून ५० हजारांहून अधिक नागरिक उपस्थित होते.

indira gandhi
Health Tips: वेळेची कमतरता असेल तर फक्त 10 मिनिटांत करा फुल बॉडी वर्कआउट

या सभेसाठी सोलापूर आणि अक्कलकोट येथून खास ७५ एसटी सोडण्यात आल्या होत्या. बैलगाड्यांत महिला व मुली, तर दुचाकीवरून पुरुष मंडळी मोठ्या संख्येने सभेला उपस्थित होते. पहाटेपासूनच नागरिकांची सभास्थानी गर्दी झाली होती. सोलापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष विजयसिंह मोहिते-पाटील यांनी विविध मागण्यांचे निवेदन श्रीमती गांधी यांना या वेळी दिले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com