
IMD Alerts Citizens as Solapur Faces Continuous Rain and Flood Risk
Esakal
गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाचा जोर आजपासून पुन्हा वाढणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार आज राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहे. दरम्यान, सकाळपासूनच सोलापूर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झालीय. पावसाची संततधार सुरूच आहे. यामुळे सीना नदीला पुन्हा महापूर येण्याची भीती व्यक्त करण्यात येतेय. पंढरपूरला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.