
Cloudy skies over Solapur as temperature drops, while rain continues in surrounding districts.
esakal
सोलापूर : अरबी समुद्रातील शक्ती चक्रिवादळाचा परिणाम सोलापूर व शेजारच्या जिल्ह्यांवर दिसू लागला आहे. सीना-कोळेगाव प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातील धाराशिव, बीड, अहिल्यानगर जिल्ह्यात शनिवारी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. सोलापूर जिल्ह्यातही माढा, मोहोळ, बार्शी तालुक्यात मध्यम पाऊस झाला.