
सोलापूर : सोलापूर शहर व परिसरात आज पावसाने दिवसभरात अधून-मधून हजेरी लावली. कधी रिमझिम तर कधी मध्यम स्वरुपाचा पाऊस असल्याने आज सोलापुरात पावसाळी वातावरण झाले होते. आज रात्री साडे आठ पर्यंत ९.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज सोलापुरात वाऱ्याचा वेग नेहमीपेक्षा कमी होता. आज आर्द्रता ९२ टक्के होती. दरम्यान रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरुच होती.