Solapur Weather Update: पावसाची चिंता कायम, आठवडाभर तापमान वाढीचा अंदाज; तापमानात २.१ अंशांची वाढ

Solapur Weather Update: Temperature Rise Raises Rainfall Concerns: हवामान विभागाच्या अंदाजानुसार १४ ऑगस्टपर्यंत कमाल तापमान ३२ ते ३३ अंशांदरम्यान राहण्याची शक्यता असून, पावसाअभावी टंचाईची चिंता वाढली आहे.
Solapur Weather Update

Solapur Weather Update

esakal

Updated on

सोलापूर: पावसाळ्याचे दोन महिने उलटूनही सोलापूर जिल्ह्यात सर्वदूर पावसाची प्रतीक्षा कायम आहे. तापमानात शुक्रवारच्या तुलनेत आज (शनिवारी) २.१ अंशांनी वाढ झाली. दुपारच्या सुमारास जाणवलेल्या उन्हाच्या चटक्याने उन्हाळ्याची आठवण करून दिली. पावसाचा अभाव आणि त्यातच वाढलेले तापमान यामुळे जिल्ह्यातील पावसाची चिंता आणखी गडद झाली आहे. एका मागून एक अनेक नक्षत्र कोरडीच चालली आहेत. जिल्ह्यात टंचाईच्या झळा दिवसेंदिवस गडद होऊ लागल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com