Cyber Scam : जादा पैशांचा आमिष नडला ! 'साेलापुरातील तरुणाला २५.८९ लाखांचा गंडा'; आई अन् स्वतःची एफडी मोडली..

high return scam: काही दिवसांनी गुंतवणुकीवरील परतावा न मिळाल्यामुळे त्याने संबंधित व्यक्तींशी संपर्क साधला, मात्र फोन बंद आढळले. त्यावेळी फसवणुकीचा संपूर्ण प्रकार स्पष्ट झाला. तरुणाने तत्काळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून गुन्हे शाखा या प्रकरणाची चौकशी करत आहे.
Cyber Scam
Cyber Scamsakal
Updated on

जादा पैसे कमाविण्याचे आमिष नडला ! साेलापुरातील तरुणाला २५.८९ लाखांचा गंडा;

शेअर मार्केटमधून जादा पैशाचे आमिष; सायबर पोलिसांत दोन तक्रारी

सोलापूर, ता. १ : शहरात मेडिकल रिप्रझेंटेटिव्हचे काम करणाऱ्या ३८ वर्षीय तरुणाला सायबर गुन्हेगारांनी तब्बल २५ लाख ८९ हजार रुपयाला गंडा घातला आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणुकीतून जादा पैसे कमाविण्याचे आमिष सायबर गुन्हेगारांनी त्याला दिले होते. त्या आमिषाला बळी पडून त्या तरुणाने सायबर गुन्हेगार सांगतील तसे पैसे गुंतवले होते. या प्रकरणी सोलापूर सायबर पोलिसांत त्याने तक्रार नोंदविली आहे.

फिर्यादी श्रीकांत चंद्रकांत जाधव या तरुणास व्हॉट्स ॲपवर एक मेसेज आला होता. त्यावर क्लिक केल्यावर त्यास सायबर गुन्हेगारांनी एका ग्रुपमध्ये सामील करून घेतले. त्या ग्रुपमधील सदस्य आपापसांत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्याने आपल्याला कशाप्रकारे जादा पैसे मिळाले, यावर बोलत होते. शेअर मार्केटमधून जास्त फायदा कसा मिळतो, याची माहिती ते एकमेकांना समजावून सांगत होते. तक्रारदाराने त्या ग्रुपवरील चॅटिंग पाहिले आणि त्यालाही पैसे गुंतविण्याचा मोह आवरला नाही. सुरवातीला दहा हजार रुपये गुंतवले. त्यानंतर थोडे थोडे करून १० ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत एकूण २५ लाख रुपये ८९ हजार रुपये गुंतवले. एवढी मोठी रक्कम गुंतवल्यावर ते पैसे परत मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सायबर गुन्हेगारांनी त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स भरावे लागतील, असे सांगितले. तेव्हा आपली फसवणूक झाल्याची बाब त्यास लक्षात आली. त्यानंतर तरुणाने सायबर पोलिसांच्या ‘एनसीसीआर’ पोर्टलवर ऑनलाइन १९३० क्रमांकावर कॉल करून तक्रार नोंदविली. सुरवातीला २८ नोव्हेंबर रोजी सात लाख ५३ हजार रुपयांची आणि ३० नोव्हेंबरला १८ लाख ३६ हजार रुपयांच्या फसवणुकीची तक्रार दिली.

आई अन् स्वतःच्या नावावरील एफडी मोडली

शेअर मार्केटमधून कमी दिवसांत जास्त पैसे मिळतील, या आशेने श्रीकांत जाधव या नोकरदार तरुणाने ५० दिवसांत २५ लाख ८९ हजार रुपये गुंतवले. त्यासाठी स्वतः:च्या व आईच्या नावावरील बॅंकांमधील ‘एफडी’ मोडल्याचेही पोलिसांनी सांगितले.

सायबर पोलिसांकडून जनतेला आवाहन

शेअर बाजाराच्या (मार्केट) बाबतीत फेसबूक, इन्स्टाग्राम, व्हॉट्स ॲप ग्रुपवर बनावट लिंक पाठविल्या जातात. त्यावर क्लिक केल्यावर व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील करून घेतले जाते. त्याठिकाणी शेअरबाजारमध्ये पैसे गुंतवले तर मोठ्या प्रमाणात परतावा मिळेल अथवा मिळवून देवू, अशी खोटी माहिती दिली जाते. सायबर गुन्हेगारांचेच लोक त्यावर चॅटिंग करतात. त्यातून आपला विश्वास बसतो आणि आपली फसवणूक होते. त्यामुळे शेअर बाजारात ऑनलाइन पैसे गुणवंतांना खात्री करा, तज्ञांचा सल्ला घ्यावा, आमिषाला बळी पडू नका, असे आवाहन सोलापूर शहर सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीशैल गजा यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com