Solapur Police arrest Ameer Dina in drug trap case; mobile phone reveals hidden evidence.
सोलापूर: शहरातील तरुणांना, विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नशेच्या जाळ्यात अडकविण्याचा डाव पोलिसांनी उधळला आहे. कर्णिक नगरातील मैदानाजवळ ड्रग्ज सप्लायर अमीर हामजा अखलाख दिना (वय ३०, रा. नॅशनल बेकरीमागे, बेगमपेठ) याच्याकडून तब्बल २९ ग्रॅम एमडी ड्रग्जसह साहित्य पोलिसांनी जप्त केले. सुमारे एक लाख रुपये किमतीचा हा साठा असून, त्याला अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता, ३ ऑक्टोबरपर्यंत कोठडी मिळाली आहे.