
CEO Jangam and 100 department heads participate in village bhajan program, engaging with locals and celebrating rural culture.
Sakal
सोलापूर: जिल्हा परिषदेचे १०० अधिकाऱ्यांनी गावात मुक्काम करून ग्रामस्थांशी संवाद साधला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायराज अभियाना अंतर्गत गावात मुक्काम, महाश्रमदान व वृक्षारोपणाची मोहीम राबविण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी स्वतः शिरवळ (ता. अक्कलकोट) येथे मुक्काम करून ग्रामस्थांशी संवाद साधत भजनात तल्लीन झाले. कर्नाटक व महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या शिरवळ गावात पहिल्यांदाच आयएएस अधिकारी मुक्कामासाठी आलेले ग्रामस्थ भारावून गेले होते.