Solapur News : सोलापूर जिल्हा परिषदेच्या सीईओ मनीषा आव्हाळे यांनी घेतला आष्टी तलावातील पाण्याचा आढावा

संपूर्ण मोहोळ तालुक्यासाठी पाण्याचा एकमेव स्त्रोत असलेल्या आष्टी तलावाची जिल्हा परिषदेच्या सीईओ मनीषा आव्हाळे यांनी पाहणी करून पाणीसाठ्याचा आढावा घेतला
Solapur News
Solapur Newssakal

मोहोळ : संपूर्ण मोहोळ तालुक्यासाठी पाण्याचा एकमेव स्त्रोत असलेल्या आष्टी तलावाची जिल्हा परिषदेच्या सीईओ मनीषा आव्हाळे यांनी पाहणी करून पाणीसाठ्याचा आढावा घेतला. त्यांनी गटविकास अधिकारी आनंद मिरगणे पाणीपुरवठा विभागाचे डब्ल्यू शेख यांना काही सूचना दिल्या गेल्या दोन वर्षापासून पाऊस नसल्याने मोहोळ तालुक्यातील अनेक विहिरी व बोर कोरडे पडले आहेत परिणामी भीषण पाणीटंचाई जाणवत आहे .

शहराप्रमाणे असा ग्रामीण भागातही चार ते पाच दिवसाआड उपलब्ध पाणी येऊ लागले आहे तेही किती दिवस येईल याचा नेम नाही गेल्या तीन ते चार महिन्यापूर्वी उजनी डाव्या कालव्याला आलेल्या पाण्याने आष्टी तलाव भरला होता सध्या आष्टीतलावात केवळ 31 टक्के पाणीसाठा आहे तो 40 दिवस पुरेत ज्या गावांना पाणीटंचाई जाणवत आहे अशा अनेक गावांनी टँकर मागणीचे प्रस्ताव तयार केले आहेत.

आष्टी तलावावर सुमारे 9 ते 10 पाणीपुरवठाच्या योजना कार्यान्वित आहेत दरम्यान सीईओ आव्हाळे यांनी भविष्यात टँकर प्रस्ताव आले तर ते भरावयाचे कोठे यासंदर्भातील वॉटर पॉईंट ची पाहणी केली तलावातील पाण्याचे योग्य नियोजन करणेच गरजेचे आहे अन्यथा संपूर्ण तालुक्याला मोठे अडचणी येऊ शकते

दरम्यान तलावाच्या पाण्यावर विविध पिके व फळबागा मिळून पाच हजार एकर बागायत आहे या पिकांच्या जीवावरच शेतकऱ्यांनी विविध बँकांची कर्ज काढले आहेत दिवसाला फक्त एक तास पाणी पिण्यासाठी दिले जाते पाईपलाईन भरण्यातच तेवढा वेळ जातो त्यामुळे हातची पिके जाणार आहेत यावेळी ग्रामसेवक दीपक शेळके

आधी सह पंचायत समितीच्या सर्व विभागातील अधिकारी उपस्थित होते

फोटो-----

आष्टी तलावातील पाण्याची पाहणी करताना सीईओ आव्हाळे व अन्य अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com