

Solapur ZP Leads by Example; Chief Minister Honours CEO for Outstanding Work
sakal
सोलापूर: सोलापूर जिल्हा परिषदेने महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवस सेवाकर्मी कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. विविध निकषांवर आधारित या गुणांकनात जिल्हा परिषदेने १०० पैकी ८० गुण मिळवले. या उल्लेखनीय यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांना मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात ‘उत्कृष्ट कार्यालय प्रमुख’ म्हणून सन्मानित करण्यात आले.