esakal | माता न तू वैरीणी ! अज्ञातांनी सोडून दिले बावी येथे नवजात अर्भक
sakal

बोलून बातमी शोधा

माता न तू वैरीणी ! अज्ञातांनी सोडून दिले बावी येथे नवजात अर्भक

माता न तू वैरीणी ! अज्ञातांनी सोडून दिले बावी येथे नवजात अर्भक

sakal_logo
By
अक्षय गुंड

या घटनेने "माता न तू वैरीणी' अशी प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : माढा तालुक्‍यातील (Madha Taluka) कुर्डुवाडी - पंढरपूर रस्त्यावरील (Kurduwadi - Pandharpur Road) बावी येथील मंदिरात आज (सोमवारी) सकाळी आठ ते दहा दिवसांचे पुरुष जातीचे नवजात अर्भक आढळून आले आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, सर्वत्र हा चर्चेचा विषय बनला आहे. (Unidentified people leaved newborn at Bavi in Madha Taluka)

हेही वाचा: म्हारी छोरियॉं छोरों से कम हैं के..!

याबाबत सविस्तर असे की, सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बावी येथील सिद्धेश्वरच्या मंदिराजवळ एक पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी आली होती. या गाडीतून चार पुरुष व एक महिला हातात लहान बाळाला घेऊन उतरले व मंदिरात जाऊन ते लहान बाळ तिथेच सोडून आलेल्या गाडीतून कुर्डुवाडीच्या दिशेने घाईगडबडीने निघून गेले. स्थानिक नागरिक येईपर्यंत ते पसार झाले होते, असे प्रत्यक्षदर्शी पाहणी केलेल्या सुदर्शन माळी यांनी "ई-सकाळ'शी बोलताना माहिती दिली.

हेही वाचा: दहावी-बारावी निकालाची ठरली तारीख !

या घटनेची माहिती गावातील पोलिस पाटील यांना देऊन त्या लहान बाळाला तातडीने गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना परिसरात समजताच तर्कवितर्क चर्चांना उधाण आले आहे. तर या घटनेने "माता न तू वैरीणी' अशी प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

बावी येथील सिद्धेश्‍वर मंदिरात नवजात अर्भक सापडले. या घटनेची माहिती आम्हाला मिळाली असून, चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात येईल.

- श्‍याम बुवा, सहाय्यक पोलिस निरीक्षक, माढा पोलिस स्टेशन

loading image