
सोलापूर : राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागातर्फे राबविल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियानामध्ये २०२३-२०२४ या वर्षात सोलापूर जिल्हा परिषदेने राज्य स्तरावरील तिसऱ्या क्रमांकाचा १७ लाख रुपयांचा पुरस्कार पटकाविला आहे. या अभियानातील उत्कृष्ठ जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांची घोषणा ग्रामविकास विभागाने केली आहे. पुणे विभागात दुसऱ्या क्रमांकाची पंचायत समिती म्हणून पंढरपूर पंचायत समितीला आठ लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला आहे.