Bengaluru police detain Solapur resident Dhanappa after his alleged remarks on a Karnataka minister’s son create controversy.
Sakal
सोलापूर
माेठी बातमी! 'साेलापुरातील धानप्पाला बंगळूर पोलिसांनी उचलले'; कर्नाटक मंत्र्यांच्या मुलाला नेमकं काय म्हणाला?
Solapur’s Dhanappa Detained by Bengaluru Police: कर्नाटकचे मंत्री आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे यांना फोन करून शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी ही कारवाई झाली. जोडभावी पेठ पोलिसांनी याला दुजोरा दिला आहे.
सोलापूर : येथील घोंगडे वस्तीतील धानप्पा श्रीशैल नरोणे या चाळीस वर्षीय तरुणाला कर्नाटकातील बंगळूर पोलिसांनी लातूर येथून अटक केली आहे. कर्नाटकचे मंत्री आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे यांना फोन करून शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी ही कारवाई झाली. जोडभावी पेठ पोलिसांनी याला दुजोरा दिला आहे. धानप्पा हा चॉकलेट आणि बिस्किटे विक्री करणाऱ्या एका कंपनीत सेल्समन म्हणून काम करतो, अशी माहिती त्याचा भाऊ नागेश यांनी दिली.

