

High-power committee approves Solapur’s Hotgi IT Park, paving the way for rapid IT development.
Sakal
सोलापूर : होटगी (ता. दक्षिण सोलापूर) येथे साकारणाऱ्या आयटी पार्कला राज्य सरकारच्या उच्चाधिकार समितीने मान्यता दिली आहे. समितीने दिलेल्या मान्यतेवर आयटी पार्कची अधिसूचना एमआयडीसी विभागाकडून काढली जाणार आहे. येत्या एक ते दोन दिवसात आयटी पार्कची अधिसूचना निघेल, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे. सोलापुरातून मुंबई आणि गोव्यासाठी विमानसेवा सुरू झाल्यानंतर आयटी पार्कला उच्चाधिकार समिती मंजुरी ही मोठी गुड न्यूज मानली जात आहे.