

Members of the Patil family with handcrafted mini Nandidhwaj that are now exported to international markets.
sakal
सोलापूर : सोलापूरच्या छोट्या नंदीध्वजांना जगभरातून मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे. शहरातील नागेश व श्रीदेवी पाटील कुटुंबीयांच्या या कलाकुसरीने आता खऱ्या अर्थाने ग्लोबल मार्केट काबीज केले आहे. यामुळे श्री सिद्धरामेश्वर यात्रेचा वारसा जगभर पोचत आहे. या यात्रेचे मुख्य प्रतीक असलेल्या नंदीध्वजांची (मानाचे काठी) क्रेझ अमेरिका, जपान, इंग्लंड सारख्या देशातूनही छोट्या नंदीध्वजांना मोठी मागणी येत आहे.