
Heavy rains and unhygienic conditions in Solapur trigger rise in skin diseases like Tinea and Candida.
Sakal
सोलापूर: अतिवृष्टी, जमिनीतील ओलावा आणि पाण्यात सतत राहण्याने शहरात त्वचारोगाचा प्रसार झाला आहे. एकावेळी बुरशी, जिवाणू व काही विषाणूजन्य आजारांचे रुग्ण वाढत आहेत. शहरात मागील काही दिवसांपासून विक्रमी पाऊस झाला आहे. अद्याप म्हणावे तसे ऊन नाही. तसेच अधूनमधून पाऊस सुरुच आहे. या वातावरणात घाण पाण्यात जाणे, पावसात भिजणे, ओल्या पाण्यात सतत राहणे, सतत बूट घालून राहणे, यामुळे टिनिया, कॅन्डिडासह त्वचेचे विकार बळावले आहेत.