सौर ऊर्जेवर मनुके तयार करणारा सोलार ड्रायर

Solar dryer made by young people in Solapur
Solar dryer made by young people in Solapur

सोलापूर : शेतकरी जास्तीत जास्त उत्पन्न मिळावे यासाठी द्राक्ष लागवड करतो. मात्र, हे पीक मोठे खर्चिक आहे. पीक घेताना पैसा खर्च करावा लागतो. मात्र, मनुके तयार करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या शेडसाठी लाखो रुपयांचा खर्च येतो. हा खर्च कमी व्हावा आणि शेतकऱ्याला कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न मिळावे, यासाठी ऑर्किड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सोलार ड्रायर प्रकल्पाची निर्मिती केली आहे.
नागेश करजगी ऑर्किड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्‍नॉलॉजी यांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जेवरील सोलार ड्रायर तयार केले आहे. यात द्राक्षापासून सौर ऊर्जेवर मनुके तयार करता येतात. हा प्रकल्प तयार करण्यासाठी खिडकीला वापरणारी काच आणि लाकूड वापरण्यात आलेले आहे. सर्वांत शेवटच्या टोकाला एक डबा बसविण्यात आला आहे. त्या डब्यात द्राक्ष टाकण्यात येतात. हा प्रकल्प तयार करण्यासाठी २० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाच्या साह्याने एका वेळी १० किलो द्राक्षापासून दोन किलो मनुके तयार करता येतात. शेतकऱ्याला नैसर्गिक पद्धतीने मनुके तयार करण्यासाठी साधारपणे १८ ते २० दिवसांचा कालावधी लागतो. मात्र, या प्रकल्पात ३२ तासांत मनुके तयार होतात. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांची वेळेची आणि पैशाची बचत होते. त्यामुळे हा प्रकल्प द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांसाठी एक नवसंजीवनी देणारा प्रकल्प ठरणारा आहे. हा प्रकल्प राकेश परदेशी, मुस्तकीम शेख यांनी तयार केला आहे. त्यांना प्रा. सी. व्ही. पोपडे यांनी मार्गदर्शन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com