
Farmlands in North Solapur leased for a 1,500-acre solar power project under renewable energy development.
esakal
-संदीप गायकवाड
उ.सोलापूर: कांद्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले गावात दीड हजार एकरांपेक्षा जास्त क्षेत्रावर सौरऊर्जा प्रकल्प होणार आहे. या प्रकल्पासाठी देशातील नामवंत कंपनीने शेतकऱ्यांच्या जमिनी भाडेपट्ट्यावर घेतल्या आहेत. निसर्गाचा लहरीपणा, सरकारची धोरणे यामुळे शेती व्यवसाय कर्जबाजारी करत असल्यामुळेच शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.