शिक्षकांच्या काही मान्यता संशयाच्या भोवऱ्यात! 'प्राथमिक' कार्यालयातून आवक-जावक नोंदवह्या गहाळ; मान्यता असलेल्यांचे रेकॉर्ड जुळेना

टप्पा अनुदानाच्या १० शाळा, २५ तुकड्यांवरील १५३ पैकी १२ शिक्षकांचेच रेकॉर्ड क्लेअर असल्याने त्यांना शालार्थ आयडी मिळाला. १४१ शिक्षकांना अजून तो मिळालेला नाही. ७० शिक्षकांचे प्रस्ताव प्राथमिक शिक्षण कार्यालयाकडे प्राप्त झाले, अनेकांच्या मान्यतेचे रेकॉर्डच सापडत नाही.
zp schools
zp schoolssakal

सोलापूर : जिल्ह्यातील २० टक्के टप्पा अनुदानाच्या १० शाळा आणि २५ तुकड्यांवरील १५३ पैकी केवळ १२ शिक्षकांचेच रेकॉर्ड क्लेअर असल्याने त्यांना शालार्थ आयडी मिळाला. पण, १४१ शिक्षकांना अजून तो मिळालेला नाही. त्यातील ७० शिक्षकांचे प्रस्ताव प्राथमिक शिक्षण कार्यालयाकडे प्राप्त झाले, पण अनेकांच्या मान्यतेचे रेकॉर्डच सापडत नाही. त्यामुळे पैसे घेऊन अर्धवट कागदपत्रांवर मान्यता दिल्याचा संशय निर्माण झाला असून आता पोलिसांत तपासांत या बाबी समोर येतील, असा विश्वास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

खासगी विनाअनुदानित प्राथमिक शाळांना २० टक्के वाढीव टप्पा अनुदान देण्याचा निर्णय शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी घेतला. त्यासाठी जवळपास सोळाशे कोटींचा निधीही दिला. परंतु, अजूनपर्यंत अनेक शाळांमधील शिक्षकांना शालार्थ आयडी मिळालेला नाही.

सोलापूरच्या माध्यमिक शिक्षण विभागातील २९८ शिक्षकासह प्राथमिक विभागातील १४१ शिक्षकांचा विषय अजूनही प्रलंबितच आहे. आता माध्यमिक शिक्षण विभागातील सात आवक- जावक नोंदवह्या गहाळ झाल्याप्रकरणी सदर बझार पोलिसांत एफआयआर दाखल झाल्यानंतर शिक्षण उपसंचालक स्तरावरून २९८ शिक्षकांच्या शालार्थ आयडीसंदर्भातील कार्यवाही सुरु झाली आहे. त्यावेळी अन्य कागदपत्रांचा आधार घेतला जात आहे. काही दिवसांत ज्यांच्याकडे अन्य २२ पुरावे आहेत, त्यांना शालार्थ आयडी मिळेल, असे उपसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

फिर्यादीत कोणत्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची असणार नावे

आता प्राथमिक शिक्षण विभागाकडेही २००९ पासूनचे तीन ते चार नोंदवह्या गहाळ झाल्याची बाब समोर आल्याने तत्कालीन अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. कार्यालयातील सर्व नोंदवह्या आहेत, पण शिक्षक मान्यतेची माहिती असलेल्याच नोंदवह्या गहाळ कशा होतात, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आता या प्रकरणी देखील पोलिसांत फिर्याद दाखल होणार आहे. त्यामध्ये कोणत्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सीईओंशी चर्चा करून पुढील कारवाई

प्राथमिक शिक्षण विभागातील काही आवक- जावक नोंदवह्या सापडत नाहीत. दुसरीकडे काही शिक्षकांच्या मान्यतेचे रेकॉर्ड आहे, पण आवक- जावक नोंदवह्यातील नोंदी व मान्यतेवरील नोंदी जुळत नाहीत. या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून पोलिसांत फिर्याद देण्याची कारवाई होईल.

- प्रसाद मिरकले, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com