
कुर्डू : उसने घेतलेले पैसे दे म्हणत जावयाच्या तोंडावर स्प्रे मारून तिघांनी बेदम मारहाण केल्याची घटना लऊळ (ता. माढा) येथे गुरुवारी (ता. १९) सकाळी १० च्या दरम्यान पंचशील नगरात घडली. या घटनेची फिर्याद जखमीची पत्नी सारिका लहू खाडे (वय ३४, रा. लऊळ) यांनी कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात दिली आहे. लहु मुकाऱ्या खाडे असे जखमीचे नाव आहे.