Maharashtra Kesari : मोहोळच्या हमालाचा मुलगा पैलवान सिकंदर शेख झाला महाराष्ट्र केसरी मोहोळ मध्ये जल्लोष

महाराष्ट्र केसरी होण्यापासून माझ्या मुलाला दोन वेळा हुलकावणी मिळाली
son of Hamal wrestler Sikandar Shaikh became maharashtra kesari
son of Hamal wrestler Sikandar Shaikh became maharashtra kesari sakal

मोहोळ : महाराष्ट्र केसरी होण्यापासून माझ्या मुलाला दोन वेळा हुलकावणी मिळाली. माझा मुलाने चित कुस्ती करूनच महाराष्ट्र केसरी व्हावा अशी माझी मोठी इच्छा होती. आम्ही गेल्या पाच दिवसापासून रात्रंदिवस यासाठी नमाज पडतोय, आम्ही ग्रामदैवत नागनाथ महाराजांना ही साकडे घातले होते.

मात्र आज आमची इच्छा पूर्ण झाली, आनंद गगनात मावेना संपूर्ण महाराष्ट्राने माझ्या सिकंदरला प्रेम दिले. ना चिंता ना भय नागनाथ महाराज की जय अशी घोषणा देत नुकताच महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळविलेला सिकंदर शेख यांचे वडील रशीद शेख यांनी प्रतिक्रिया दिली. दरम्यान महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळाल्याचे समजताच मोहोळ नगर परिषदेसमोर नागरिकांनी फटाके फोडून पेढे वाटून आनंदोत्सव व जल्लोष साजरा केला.

पुणे येथे नुकत्याच संपन्न झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मोहोळचा पैलवान सिकंदर शेख याची महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याच्या बरोबर कुस्ती झाली त्यावेळी पैलवान राक्षे यांच्यावर मात करत सिकंदर शेख याने महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळविला.

सिकंदर शेख यांचे वडील रशीद शेख आज ही मोहोळ शहरातील मोठ्या किराणा दुकानात हमाली करतात. त्यामुळे आपला पोरगा महाराष्ट्र केसरी झाल्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावेना. दरम्यान पैलवान सिकंदर शेख याचे चुलते व सर्वच कुटुंबीय यांची परिस्थिती साधारण आहे.

त्याचे चुलते शब्बीर शेख म्हणाले, आमच्या गल्लीतील व प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्या या विजयात मोठा वाटा आहे. त्यांनी सिकंदर कडे पाचव्या वर्षापासून लक्ष दिले आहे. खुराकासाठी ही सहकार्य केले, प्रोत्साहन दिले. आजही त्यांची मदत आहेच. सिकंदरच्या घरात सुमारे 200 मानाच्या गदा आहेत. बुलेट गाड्या, जीप गाड्या, कार, ट्रॅक्टर या वस्तू बक्षीस रूपाने मिळाल्या आहेत.

आजचा हा सोहळा म्हणजे आमच्या कुटुंबातील सुवर्ण अक्षराने लिहिलेला क्षण म्हणले तरी वावगे ठरणार नाही. यावेळी रमेश बारसकर, वडील रशीद शेख, विनोद कांबळे, मंगेश पांढरे, यशवंत गावडे, तन्वीर शेख, बाबुराव ढाणके, जितेंद्र अष्टुळ, दिनेश गडदे, श्री सलगर आदी सह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com